चिपळूण – स्वयंअध्ययनावर भर दिल्यास एक्सट्रा क्लास ची गरजच नाही असे मनोगत दहावी परीक्षेत चिपळूण तालुक्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विनय पूनमचंद भावसार या विद्यार्थ्याने सागर वेव्हशी बोलताना मांडले.
दहावी परीक्षेत विनयने 98.80% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांकाने येण्याचा मान मिळवला आहे. तसेच गणित आणि संस्कृत विषयात शंभर पैकी 100 मार्क त्याने प्राप्त केले आहेत. त्याशिवाय पोहणे, वाचन करणे, तायक्वांडो अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्याने यश प्राप्त केले आहे. त्याचे वडील पूनमचंद भावसार हेही एका शाळेत मुख्याध्यापक आहेत. युनायटेड इंग्लिश स्कूल मधील खाडे, चितळेसर, जोशी मॅडम यांचे आपल्याला चांगले मार्गदर्शन लाभले. त्याशिवाय चतुरंग प्रतिष्ठानच्या अभ्यास वर्गाला उपस्थित राहिल्यामुळे त्याचाही फायदा झाला असे विनयने कृतज्ञपूर्वक सांगितले. भविष्यात देशसेवा करण्याचा मानस त्याने व्यक्त केला.