मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झेंडावंदन करुन प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवाराला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतानाच दादांच्या आठवणींना उजाळा दिला. याशिवाय ए-१० बंगल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कशी सुरुवात झाली आणि त्यानंतर झालेल्या मेळाव्याची माहिती दिली. त्यानंतर आदरणीय नेते अजितदादा पवार यांना प्रदेश कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, खासदार राजेंद्र जैन, आमदार संजय खोडके, आमदार सना मलिक-शेख, आमदार झिशान सिद्दीकी, आमदार पंकज भुजबळ, आमदार शेखर निकम, आमदार, काशिनाथ दाते, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार अमोल मिटकरी,, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र लावंघरे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.