मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवली (पूर्व) येथील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेवक महेश पाटील, नगरसेवक नंदू म्हात्रे, नगरसेवक विनोद कालन, नगरसेवक मंदार तावरे, नगरसेवक जालिंदर पाटील, नगरसेविका रंजना पेणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, शशिकांत कांबळे, अभिजित थेरवळ, पूर्व मंडळ अध्यक्ष नितेश पेणकर, जितू भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.