चिपळूण : खेड येथील विभा अरविंद ग्रंथालयाला भाजप आमदार व कोकण विभागीय समन्वयक माननीय श्री.प्रमोद जठार तसेच भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.प्रशांत यादव यांनी तपपूर्ती अभियाना अंतर्गत नुकतीच सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान मान्यवरांचे स्वागत विभा अरविंद ग्रंथालयाचे सक्रिय कार्यकर्ते ग्रंथालयाचे सदस्य श्री. गिरिश बांदिवडेकर यांनी शाल, श्रीफळ आणि ग्रंथ भेट देऊन केले. वाचनालय स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना श्री बांदिवडेकर यांनी सांगितले की चिपळूण मधील नागरिकांमध्येl विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचन चळवळी विषयी आपुलकी व आवड निर्माण व्हावे या हेतूने आदरणीय श्री प्रकाश देशपांडे यांच्या प्रेरणेने श्री बापू काणे यांच्या अध्यक्षतेखाली, श्री विनायक ओक गुरुजी डॉ. वैशाली जाधव, प्रो. विकास मेहंदळे, श्री विजय कदम, श्री सुहास चव्हाण, डॉ राजश्री सोमण, सौ मेघा बेटकर,श्री प्रसाद रिसबुड या संचालक मंडळाच्या सहकार्याने विभा अरविंद ग्रंथालयाची निर्मिती झाली आहे.
चिपळूणचे सुप्रसिद्ध त्वचाविकार चिकित्सक डॉ. यतिन जाधव यांचे वडील कै. अरविंद जाधव (अप्पा) व मातोश्री विभा अरविंद जाधव यांचे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात समृद्ध व लक्षणीय योगदान असून, त्यांचा साहित्यसमृद्ध वारसा व समाजभान यांच्यापासून नवीन पिढीला प्रेरणा मिळावे मिळावी, हा उद्देश समोर ठेवून वाचनालयाची वाटचाल चालली आहे.सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेली महागडी पुस्तके ही उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या वाचनालयातून केले जात आहे. वाचनालयाच्या आतापर्यंतच्या अल्प कारकीर्दीत अनेक मान्यवरांनी या वाचनालयाला भेट दिली आहे व सदिच्छा पूर्ण योगदानही या वाचनालयाला समाजातील श्रेष्ठ व्यक्तींकडून लाभत आहे. वाचनालय याबद्दल कृतज्ञ आहे.
उपस्थित मान्यवरांनी विभा अरविंद वाचनालयाच्या कार्याचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. यावेळी आमदार प्रमोद जठार वाचनालयाविषयी गौरव पूर्ण उद्गार काढताना म्हणाले की, ज्ञान समृद्ध व समाजभान जपणाऱ्या विभा अरविंद ग्रंथालयासारख्या प्रकल्पांची आज समाजाला नितांत गरज आहे*”.
यावेळी भारतीय जनता पार्टी चे चिपळूण शहर मंडल अध्यक्ष श्री. शशिकांत मोदी, विभागीय मंडळ अध्यक्ष श्री. विनोद भूरण, नगरसेवक श्री. संदीप भिसे, नगरसेवक श्री. शुभम पिसे उपस्थित होते.
तसेच ग्रंथालयाचे संचालक मंडळ सदस्य श्री. गिरिश बांदिवडेकर, श्री. सुहास चव्हाण, श्री. विकास मेहेंदळे, प्रसाद रिसबूड, श्री. विनायक ओक, सौ. मेधा बेटकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.