खेड : खेड ते भरणा नाका मार्गावरील महाड नाका येथील खेड बस डेपोजवळील स्मार्ट बाजार नजिकच्या भाजीच्या दुकानाला अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून, आग कशामुळे लागली याचे कारण समजुन येत नाही. ही आग गुरुवार दि. 15 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 01.18 वाजताच्या सुमारास ही आग लागली असुन, आगीचे वृत्त समजताच खेड मधील अग्निशामक दलाचे जवान दिपक देवळेकर, शाम देवळेकर, सुरज शिगवण चालक गजानन जाधव, तसेच नगराध्यक्षा सौ. माधवीताई बुटाला, नगरसेवक श्री. सुनिल दरेकर अग्निशामक बंबासह घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यात शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. ही आग मोबाईल चार्जर्स शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
खेड मधील स्मार्ट बाजारसमोरील दुकानाला अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेत मोठ्याप्रमाणावर नुकसान…
