दापोली :महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने केबल नाल्यांमधून टाकल्याने या पावसात मुरुड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता असून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुरुड मध्ये भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू असून हे केबल नाल्यांमध्ये अस्ताव्यस्त पडलेले दिसत आहेत.
महावितरण च्या कामांचा दापोली तालुक्यात सर्वत्रच बोजवारा उडालेला आहे. दापोली तालुक्यात वीज समस्या तर आहेच त्याशिवाय भूमिगत केबल टाकून रस्त्याची देखील दूर्दशा सर्वत्र दिसून येत आहे. आणि आता पावसामध्ये भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू असताना मुरुड मध्ये मात्र केबल नाल्यांमधून पडलेले दिसून येत आहेत.त्यामुळे पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी जाण्याची भीती व्यक्त होत आहे. महावितरणच्या या अजब कारभारामुळे मुरुड गावातील खालची पाखाडी, वरची पाखाडी आणि भंडारवाडा येथे पाणी मोठ्या प्रमाणात भरणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
भूमिगत केबल टाकण्याची ही कोणती पद्धत आहे असा प्रश्न देखील मुरुड मधील स्थानिक नागरिक विचारत आहेत.
दापोली तालुक्यातील मुरुड मध्ये महावितरणचा अजब कारभारपावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते- नागरिकांची भीती
