चिपळूण : शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महिला आघाडी अधिक सक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने आणखी दोन महिला कार्यकर्त्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. सौ. फिरदोस कवारे आणि सौ. संजना संजय गोताड यांची शिवसेना महिला आघाडीच्या चिपळूण उपशहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.

महिला आघाडी उपजिल्हा संघटक रत्नागिरी सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच महिला आघाडीचा विस्तार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन (भैया) कदम, राजापूर तालुका संपर्क संघटक सौ. समीक्षा सक्रे, संगमेश्वर संपर्क संघटक सौ. सुवर्णा खेडेकर, रत्नागिरी दक्षिण जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, तालुका संघटक सुधीरभाऊ शिंदे, शहर सचिव प्रशांत मुळये, शहरसंघटक वैशाली शिंदे, शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, उपशहरप्रमुख व गटनेते तथा नगरसेवक मिथिलेश (विकी) नरळकर, नगरसेवक संजय गोताड, मनोज पांचाळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला शक्तीच्या बळावर शिवसेना संघटना आणखी मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महिला आघाडीच्या माध्यमातून पक्षाची भूमिका, विचार आणि जनसंपर्क अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास उपस्थित पदा