मुंबई : माजी मंत्री स्वर्गीय दत्ता मेघे यांचे चिरंजीव आणि भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष अर्जुन मेघे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी मंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा आणि अर्जुन मेघे यांनी आपले विचार मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील नेते आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार संजय खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.