दापोली (चंद्रशेखर जोशी) : लांबलेल्या पावसामुळे पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील गोडबोले आळीतील भक्तांनी श्री सिद्धिविनायकाला साकडे घालत श्री गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने केली. तसेच २४ तास जलाभिषेक करत अनुष्ठान पार पाडले.
राज्यभर पाऊस पडत नसल्याने जनतेला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, जवळपास एक महिना पाऊस लांबणीवर गेल्याने अनेकजण पावसासाठी देवाला साकडे घालत आहेत.
गिम्हवणे येथील गोडबोले आळीतील भक्तांनीही काल सकाळपासून या अनुष्ठानाला सुरुवात केली होती. आज दुपारी या अनुष्ठानाची सांगता करण्यात आली.
