मा. गिरीशभाऊ महाजन यांची बदनामी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड; विकृती पसरवणाऱ्यांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल.

प्रदेशात बसलेला एक ट्विटर अकाउंट हँडलर, जो फक्त भाजप नेत्यांविरोधात गरळ ओकतो, ज्याच्यावर बदनामी केल्याचे असंख्य गुन्हे दाखल आहेत, त्याला कौटुंबिक नात्यांचीही चाड नाही आणि लेकीबाळींच्या इभ्रतीचीही परवा नाही. फक्त तुकडा फेकला की ट्विट करायचे, हे ज्याचे काम आहे, त्याने आपल्या सडक्या व विकृत मेंदूतून काही घाणेरड्या ओळी लिहून ट्विट केले. ते ट्विट सुषमा अंधारे यांनी रिट्विट केले.

खरे तर, अंधारे यांच्यावर कला केंद्रावर देहविक्रीसाठी लहान मुलींना विकणाऱ्या आरोपींना मदत केल्याचे आरोप आहेत. सार्वजनिक जीवनात जेवढे घाणेरडे बोलता येईल तेवढे बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या बाईंनी अशा प्रसंगाचा लाभ पदरात पाडून घेतला नसता, तरच नवल वाटले असते. स्वतःच्या पक्षात किंमत नाही म्हणून या बाई पक्षाच्या मेळाव्यात ढसाढसा रडल्याचेही सर्वांनी पाहिले आहे.