चिपळूण : श्री ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट चिपळूण आणि गांधारेश्वर सेवा मंडळ समिती आणि मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने समस्त चिपळूण वासियांना आवाहन करण्यात येत आहे कि…
दुष्काळ आणि देवाला घातलेली आर्त हाक हा भारताच्या शेतीप्रधान संस्कृतीचा आणि बळीराजाच्या संवेदनशील मनाचा एक भावूक भाग आहे.दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असून पावसाची दीर्घ प्रतीक्षा, शेतातील वाळलेली पिके आणि विहिरींच्या तळाला गेलेले पाणी, संपूर्ण जिल्हात उन्हाळ्यापेशा भीषण पाणी टंचाई जाणवत असून ग्रामीण भागात शेतकरी पेरणीसाठी तयारीत असून देखील पाऊसाने पाठ फिरवली असल्याने हताश झालेला बळीराजा अखेरिस परमेश्वराकडे म्हणजेच आपल्या देवाकडे पावसासाठी आणि संकटाच्या निवारणासाठी प्रार्थना करतो. आपण देखील वाशिष्ठी नदीच्या काठावरील स्वयंभू देवस्थान श्रीक्षेत्र गांधारेश्वर येथील महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करत हर हर महादेव अशा जयघोषात आर्त हाक मारून आलेल्या संकटावर मात करण्याचे आवाहन करून महादेवाचा गाभारा पाण्याने भरण्यासाठी सर्व भक्तगणांनी सोमवार दिनांक २२ जून रोजी सकाळी ७:०० वाजता उपस्थित राहून सहभागी व्हावे