रत्नागिरी :जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर स्फोटक पदार्थाविरोधात प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या.त्याच अनुषंगाने दि २८ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना खेड-मंडणगड रस्त्यावर मौजे मुगीज येथे सायंकाळी सुमारे ५:२५ वा. संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेण्यात आले.
तपासा दरम्यान सदर इसमाचे नाव प्रकाश राम जगताप,( वय 33 वर्षे, रा. शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी )असे असून, त्याच्या ताब्यातून बेकायदेशीररीत्या स्फोटक पदार्थ सदृश ७० जिवंत गावठी बॉम्ब तसेच एक चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संशयी कडील स्फोटक पदार्थ सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने त्यास तत्काळ ताब्यात घेऊन दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलीस ठाणे करीत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच बेकायदेशीर स्फोटक पदार्थांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत असून, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा डायल ११२ या संपर्क क्रमांकावर कळवावी, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.
ही, कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
