मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) सोडून नुकतेच शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे पत्रकारांशी शिवीगाळ व अरेरावीची भाषा वापरल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केल्याची घटना घडली.
“तुम्ही परत इकडे आलात, तर मी तुम्हाला मारून पाठवेन,” असे शब्द त्यांनी वापरल्याचे सांगितले जाते. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. यानंतर संजय दिना पाटील यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. “माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये जो प्रकार घडला, त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” असे पाटील यांनी म्हटले आहे.
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याच्या घटनेनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या प्रकारानंतर त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. “माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये जो प्रकार घडला, त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मला अत्यंत वाईट शब्दांत शिवीगाळ करून अपमानित करण्यात येत होते. माझ्या परिवाराला दिल्या जाणाऱ्या शिव्यांपासून त्यांना दूर ठेवा, एवढीच माझी विनंती होती. घडलेल्या प्रकाराबद्दल मी माफी मागतो,” असे संजय दिना पाटील म्हणाले. तसेच, “अनवधानाने माझ्याकडून ते शब्द निघाले,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
