दापोली, (चंद्रशेखर जोशी) : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांचे अपघाती दुःखद निधन झाल्याने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन दापोली येथील फाटक कॅपिटल सभागृह येथे करण्यात आले होते.
या शोकसभेला दापोलीतील सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दापोली अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव थोरात, राष्ट्रवादी (शरद पवार) चे पदाधिकारी माधव शेट्ये, शिवसेनेचे सुधीर कालेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हृषीकेश गुजर, भाजपचे माजी आमदार सुर्यकांत दळवी, कॉंग्रेसचे बंटी मोरे, माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, संदीप राजपुरे यांनी अजितदादा यांच्या संदर्भातील आठवणी सांगितल्या. त्यानंतर उपस्थितांनी अजितदादा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
