दापोली (वार्ताहर) : ७ फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जास्तीतजास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढवा, मतदार जागृत व्हावेत यासाठी निवडणूक विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांनी दापोली तालुक्यातील वाकवली येथील बस थांब्याजवळ गीते सादर करून मतदार जनजागृती अभियान राबविले.
या कलापथकामध्ये संतोष सकपाळ, बाबू घाडीगांवकर, महेश गिम्हवणेकर, नितीन गुहागरकर, स्मिता कदम, अस्मिता बालगुडे, संजीवनी लाडे, संजय मेहता, पथक प्रमुख गुलाबराव गावित, मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे हे सहभागी झाले होते. जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन या पथकाद्वारे करण्यात आले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY