महाराष्ट्र : राज्यात गेल्या २४ तासांत दमदार पाऊस झाला असून, कोकणातील काही भागांत अतिवृष्टी ते अतिमुसळधार, तर राज्यभर मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, राज्यात ३ व ४ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ व मराठवाड्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने थांबलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे जुलैची सुरुवात मुसळधार पावसाने होणार आहे. आज, सोमवारी (दि. २९ जून), कोकणात अतिमुसळधार, तर उर्वरित भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. आगामी पाच दिवस राज्यात चांगल्या पावसाची शक्यता असून, कोकण व मध्य महाराष्ट्रासाठी ३० जून ते ४ जुलैदरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अशी आहे मान्सूनची स्थिती

  • महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत पूर्व-मध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेली चक्रीय स्थिती कायम आहे.
  • उत्तर-मध्य प्रदेशापासून सौराष्ट्र, उत्तर मराठवाडा ओलांडत अरबी समुद्रापर्यंत समुद्रसपाटीपासून ३.१ ते ४.५ कि.मी. उंचीवर द्रोणीय रेषा सक्रिय आहे.

गत २४ तासांत राज्यात झालेला पाऊस (मि.मी.मध्ये)

कोकण : म्हसळा २४०, दापोली १९३, वाकवली १८६, मंडणगड १८०, खेड १७२, चिपळूण १३५, माणगाव १३३, पोलादपूर १३०, पालघर १२२, पनवेल १२०, मुलडे ११३, तळा १०७, राजापूर व संगमेश्वर (देवरुख) १०४, वैभववाडी ९८, महाड ९७, कुडाळ ९२, केपे व काणकोण ९०, फोंडा ८५, लांजा व ठाणे ८४, गुहागर ८३, मडगाव ७७, श्रीवर्धन ७०, जव्हार ६३, कणकवली ५९, वसई ५८, रामेश्वर ५६, मालवण ५०.

मध्य महाराष्ट्र : लोणावळा ११८, गगनबावडा ११४, खेड (राजगुरुनगर) १०५, रावेर, नेवासा व वाई ४९, श्रीगोंदा, श्रीरामपूर व राधानगरी ४५, शाहूवाडी ४४, संगमनेर ३५, मोहोळ ३३, बारामती २२.

मराठवाडा : वैजापूर ४८, किनवट ४२, लोहा व नायगाव (खैरगाव) ३७, रेणापूर व माहूर ३५, मुखेड ३२, धर्माबाद २९, अहमदपूर व सोनपेठ २८, जळकोट २६, लातूर २५, पाटोदा २४, शिरूर अनंतपाळ २३, केज व गाखेड २०, कलमनुरी व उमरी १९.

विदर्भ : महागाव ५६, खरंगणा ५२, घाटंजी ४२, दारव्हा ३९, पुसद ३८, दिग्रस ३६, रामटेक ३३, साकोली ३२.

घाटमाथा : लोणावळा १६०, डुंगरवाडी १५८, वळवण, कोयना (पोफळी) व ताम्हिणी १२५, लोणावळा (टाटा) १००, धारावी ८१, खोपोली ७५, शिरगाव ६०, भिवपुरी ५४, दावडी ५०, शिरोटा ४६.