रायगड : रायगडचे लोकप्रिय खासदार आणि विकासाचे शिल्पकार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीवर्धनमध्ये सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडले. वाढदिवसाचा बडेजाव न करता थेट जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली. वडवली येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत नेत्रतपासणी शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या शिबिराची सविस्तर माहिती पाहूया.

खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत वडवली येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या आरोग्यसेवा उपक्रमाचा लाभ परिसरातील शेकडो गरजू नागरिकांनी तसेच महिला भगिनींनी घेतला.

या भव्य शिबिराला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मंदारभाई तोडणकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मदभाई मेमन, पंचायत समितीचे सभापती सचिनभाई कीर आणि मतदारसंघ अध्यक्ष उदयदादा बापट प्रामुख्याने उपस्थित होते.

या नेत्यांसोबतच ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश घरत, ग्रुप ग्रामपंचायत वडवलीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी म्हणून सुनीलजी तटकरे साहेबांनी रायगड जिल्ह्याच्या विकासात दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरव करत सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांनी त्यांना उत्तम आरोग्य, सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.