चिपळूण : तालुक्यातीलच नव्हे तर रत्नागिरी जिल्हयात प्रसिद्ध असलेले नाट्यकर्मी प्रसाद उर्फ भाऊ कार्ले यांनी त्यांच्या संग्रहात असलेली दुर्मिळ पुस्तके आज वाचनालयाला भेट स्वरूपात दिली. या पुस्तक संचात नाटके, धार्मिक, पर्यटन तसेच थोर व्यक्तींची चरित्रे यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या प्रारंभी संचालक सुनिल खेडेकर यांनी प्रसाद कार्ले यांचे स्वागत करून सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली. त्यांनी दिलेल्या पुस्तकांचा स्वीकार वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत व कार्यवाह सुमेध करमरकर यांनी केला. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. या योगदाना बद्दल प्रसाद उर्फ भाऊ कार्ले यांचे वाचनालयाच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह, स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वाचनालयाचे संचालक शरद तांबे, विनायक ओक, प्रदीप पवार, अमित ओक, प्राची जोशी, ग्रंथपाल तेजश्री सोमण व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला प्रसाद कार्ले यांनी दिली पुस्तके भेट….
