चिपळूण : राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता चिपळूण येथे महावितरण कार्यालय (पॉवर हाऊस) येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना चिपळूण शहरप्रमुख श्री. सचिन (भैय्या) कदम करणार असून, मोर्चाची सुरुवात शिवसेना चिपळूण तालुका जनसंपर्क कार्यालय येथून होऊन महावितरण कार्यालय, पॉवर हाऊस, चिपळूण येथे समारोप होणार आहे.
या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच शिवसैनिकांनी सकाळी १०.३० वाजता चिपळूण तालुका जनसंपर्क कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच चिपळूण शहरातील स्मार्ट मीटर बसविण्याला विरोध असलेल्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सागर प्रेस, चिपळूण येथे सकाळी १०.३० वाजता
उपस्थित राहून या जनआंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
स्मार्ट मीटर संदर्भातील जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी व नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या धडक मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, युवासेना तालुका अधिकारी प्रितम वंजारे तसेच युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांनी केले आहे.
या धडक मोर्चाचे वृत्तांकन करण्यासाठी सर्व दैनिकांचे प्रतिनिधी, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, डिजिटल माध्यमांचे पत्रकार, वेब पोर्टल्स, न्यूज चॅनेल्स, छायाचित्रकार तसेच समाजमाध्यमांवर वार्तांकन करणाऱ्या सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी उपस्थित राहून या आंदोलनाचे वार्तांकन करावे, अशी नम्र विनंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
