चिपुळूण : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजप नेते ना.आशिष शेलार हे उद्या बुधवारी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत.ते सकाळी ९ वाजता वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर ते चिपळूण बहादूरशेख येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळावा व कलाकारांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
​राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजप नेते ना.आशिष शेलार हे उद्या बुधवारी दि.१५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.दौऱ्याची सुरुवात खेड येथून होणार असून, सकाळी ९ वाजता वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर ते चिपळूण बहादूरशेख येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळावा व कलाकारांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहतील. या मेळाव्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

यानंतर ना. शेलार रत्नागिरी दक्षिण भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते संगमेश्वरकडे रवाना होणार आहेत.
संगमेश्वर येथे छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारकास अभिवादन केल्यानंतर नाचणे-देऊड (नाटवळवाडी) येथील जागृतदेवी मंदिर परिसरातील कार्यक्रमात सहभागी होतील. पुढे ते रत्नागिरी शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक व संघटनात्मक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
या दौऱ्यात विधान परिषदेचे सदस्य आमदार प्रमोद जठार तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.ना. आशिष शेलार यांच्या या दौऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, दौऱ्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.