चिपळूण : राजकारण हे घाणेरडे नाही…राजकारण करणाऱ्यांनी ते घाणेरडे केले आहे… राजकारणातील ही घाण बाजूला करण्याची जबादारी तरुणाईची असून मोठ्या संख्येने विद्यार्थी ही घाण साफ करण्यासाठी एकवटत आहेत असे प्रतिपादन मनसेचे जिल्हा सचिव श्री सचिन गायकवाड यांनी केले.
मनसेच्या विद्यार्थी संघटनेत आज चिपळूण येथील डिबिजे व आजूबाजूच्या कॉलेजमध्ये असणाऱ्या सुमारे पन्नास ते सात कॉलजे युवकांनी मनसेचे विद्यार्थी संघटनेत प्रवेश केला .जिल्हा सचिव श्री सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थित हा पक्षप्रवेश करण्यात आला ,यावेळी उपजिल्हाधक श्री विनोद जाणवलकर,मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाधक्ष राजू खेतले माजी शहराध्यक्ष श्री गोंजारी, प्रसिद्ध वकील वृषाली सावंत विनोद चिपळूणकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना श्री गायकवाड बोलत होते.
चिपळूणमध्ये मनसे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे याच्याच प्रत्यय आता येऊ लागला आहे. काही दिवसापूर्वी शेकडोंच्या संख्यने कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला असताना आता एवढ्या मोठ्या संख्येने कॉलेज विद्यार्थी पक्ष प्रवेश करीत असून चिपळुणात मनसेच्या इजिनला खऱ्या अर्थाने गती मिळाल्याचे पहावयास मिळत असून असाच जिल्ह्यात प्रतिसाद मिळणार हे नक्की असे श्री गायकवाड यांनी सांगितले.
राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. निष्ठा राहिल्या नाहीत राजकारण घाणेरडे म्हटले जात आहे. मात्र राजकारण घाणेरडे नाही राजकारणात काही लोकांनी घाण केली आहे .मात्र मोठ्या प्रमाणात देशात तरूणाई सक्रिय झाली आहे. सक्रिय झालेली तरुणाई राजकारणातील ही घाण नक्कीच साफ करतील सोनम वांगचुक यांचे आंदोलन दडपत आहेत. मात्र तरुणाई जोशात या विरोधात उतरली आहे तरुणाची चळवळ देशात पुन्हा उभी राहत असून तुम्हाला ही यामध्ये सहभागी व्हावे लागणार असल्याचे श्री गायकवाड यांनी सांगितले.
तुमची निष्ठा आणि पक्षावरचे प्रेम आज मला पहावयास मिळाले तीन साडेतीन तास तुम्ही माझी वाट बघत होतात मात्र येथून कोणीही बाहेर गेले नाही . याच पक्षावर असलेल्या निष्ठा असून तुम्हाला जे सहकार्य लागेल ज्या अडचणी जाणवतील त्या सोडवण्याचा आम्ही सारे प्रयत्न करूच बरोबर तुम्ही केवळ राजकारण समाजकरणं न करता प्रथम आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन श्री गायकवाड यांनी केले..
चिपळूण शहरातील पाग ,खिंड कोलेखजन,गोवळकोट सती खेर्डी मालडोली,बावशेवाडी येथील तरुणांनी आज मोठ्या संख्येने मनसे विद्यार्थी संघटनेत प्रवेश केला.
मनसेच्या विद्यार्थी संघटनेत ५० ते ६० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रवेश; राजकारणातील घाण दूर करण्याची जबाबदारी तरुणाईची – सचिन गायकवाड
