चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे आदरणीय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आज जिद्द शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष नितीनशेठ ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंदशेठ कापडी, नगरसेवक योगेश पवार, नगरसेविका शहनाज वांगडे, पक्षाचे पदाधिकारी डॉ. रहेमत जबले, पूर्वा आयरे, शहराध्यक्ष अदिती देशपांडे, जिद्द शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.