मुंबई : रोहित पवार यांनी राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा विपर्यास करून मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुस्थिती अशी दिसते की, संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करतांना दिसत नाहीत. ते निळ्या शर्टमधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले होते. हे व्हिडिओच्या सुरूवातीपासून स्पष्ट दिसत आहे.

रोहितदादा, तुमच्या राजकीय फायद्यासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी मुंबई पोलीसांना बदनाम करू नका. फक्त सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा तथ्यांची पडताळणी करूनच सार्वजनिक आरोप करायला हवेत. तुमचं हे राजकारण बघून जनतेच्या डोक्यात तिडीक येते हे लक्षात ठेवा.

मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचं राजकारण थांबवा आणि व्हिडिओ पुन्हा एकदा नीट डोळे उघडून बघा.