चिपळूण : यावेळी शिवसेना शहर अधिकारी श्री.सचिन (भय्या) कदम युवासेना पेठमाप उपविभाग अधिकारी श्री. शाकीर निसार अरकाटे, युवासेना शहराधिकारी श्री. पार्थ जागुष्टे , तसेच युवासेनेचे आकाश कदम, राहुल गुरव, ओंकार गायकवाड, झियाद चिकटे, अफ्फान मुकादम, रेहान पवार आणि सर्व शिवसेना व युवासेना पदाधिकारी, शाखाप्रमुख व शिवसैनीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेठमाप, गोवळकोट रोड, काविळतळी, गुरुकुल कॉलेज परिसर तसेच संपूर्ण चिपळूण शहरातील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढत असून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन सर्व खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, तसेच नागरिकांना सुरक्षित व खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी ठाम मागणी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
“जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना आणि युवासेना नेहमीच रस्त्यावर उतरून आवाज उठवत राहील.”
