दापोली : दिल्ली येथे आयोजित एका दिमाखदार आणि भव्य सन्मान सोहळ्यात, पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठातर्फे श्री रामराजे शैक्षणिक संकुलाचे संचालक, शिक्षणतज्ज्ञ मा. डॉ. संदीपजी राजपुरे यांना प्रतिष्ठेची ‘मानद डॉक्टरेट’ (Honorary Doctorate) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील गौरवपूर्ण कामगिरीबद्दल ‘श्री स्वराज्य प्रतिष्ठान, दापोली’च्या वतीने त्यांचे अत्यंत सस्नेह आणि अभिमानपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बी. आर. मोरे यांनी डॉ. संदीपजी राजपुरे यांना पुष्पगुच्छ व अभिनंदन पत्र देऊन सन्मानित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महानगरांच्या पातळीवरचे दर्जेदार, आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे, या उदात्त ध्येयाने त्यांनी शालेय शिक्षणापासून ते थेट उच्च, व्यावसायिक आणि आरोग्य क्षेत्रातील नर्सिंग, फार्मसी, फिजिओथेरपी यांसारख्या उच्चस्तरीय अभ्यासक्रमांचे शैक्षणिक विश्व कोकणात उभे केले आहे. त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानामुळे संपूर्ण कोकणभूमीची मान उंचावली असून, हा क्षण सर्व कोकणवासीयांसाठी अत्यंत ऐतिहासिक व अभिमानाचा असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने नमूद करण्यात आले.
या कौतुक सोहळ्यास ‘श्री स्वराज्य प्रतिष्ठान’चे सहखजिनदार विशाल रेवाळे, सचिव जयवंत चव्हाण आणि सल्लागार संदीप महादवे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
श्री रामराजे शैक्षणिक संकुलाचे संचालक मा. डॉ. संदीप राजपुरे यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी जाहीर; ‘श्री स्वराज्य प्रतिष्ठान, दापोली’च्या वतीने सस्नेह सत्कार…
