दापोली : भारतीय असंतोषाचे जनक आणि थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित , प्रा वा ना . दांडेकर बालकमंदिर शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाची सुरुवात पालक मंदार देपोलकर यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .
या कार्यक्रमात मोठा शिशु वर्गातील विद्यार्थ्यांनी टिळकांचे गाणे तसेच टिळकांची शेंगांची गोष्ट यांचे सादरीकरण केले. यासाठी शाळेच्या शिक्षिका श्रीम . खटावकर, सौ पवार व सौ कांबळे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले .
काही विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांबद्दल मनोगत आपल्या आपल्या भाषणातून व्यक्त केले . ” लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा या वृत्तपत्रांतून जनमानसात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवली . त्यांनी सुरू केलेले सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव आजही आपल्या समाजाला एकत्र बांधून ठेवतात “, असे प्रतिपादन
मंदार देपोलकर यांनी आपल्या मनोगतातून केले .