सातारा /फलटण: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत ‘कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे’ असा धीराचा शब्द देत सुनेत्रा पवार यांनी कुटुंबियांना आधार दिला. या भावस्पर्शी प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले.

कर्तव्यावर असतानाही अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबियांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्त्रीच्या संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY