मुंबई – राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेश कार्यालयात आज साजरी करण्यात आली.
त्यानंतर महात्मा गांधीजी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक-शेख, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, कार्यालयीन सचिव संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस बापू भुजबळ,प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
