खेड : – तालुक्यातील एका गावातील पोस्ट ऑफिस कामाच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या पोस्टमास्तरवर ” पोस्को ” अंतर्गत गुन्हा दाखल करून या नराधमाला अटक करण्यात आल्यानंतर येथील जिल्हा न्यायालयात त्याला हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
                  खेड तालुक्यातून विश्वासाला तडा देणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पोस्ट ऑफिसमधील कामाच्या निमित्ताने एका कुटुंबाशी ओळख निर्माण झालेल्या ५६ वर्षीय संशयित आरोपी नरेश बाबाजी मोरे या पोस्टमास्तरने आरडीच्या पावत्या लिहिणे, आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रांच्या कामाचे आमिष दाखवत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून खेड पोलिसांनी संशयित आरोपी नरेश बाबाजी मोरे (वय ५६, रा. आस्तान, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यासह संबंधित कलमांन्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे.