चिपळूण : SIR कार्यक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघ प्रथम आल्याबद्दल, आणि या प्रक्रियेमध्ये उत्कृष्ट नियोजन करून उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरवण्यात आलेले चिपळूणचे प्रांतअधिकारी श्री आकाश लिंगाडे साहेब यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज प्रांतअधिकारी कार्यालय मध्ये जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
त्यावेळी प्रांताधिकारी साहेबांनी सर्व प्रक्रियेची माहिती उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच पक्षाच्या सर्व BLA नी या प्रक्रियेमध्ये सर्व BLO ना सहकार्य केल्याबद्दल आपण हा टप्पा गाठू शकलो. त्याबद्दल सर्वांचे आभार मानले .
यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शहर प्रमुख भैया कदम, शहर सचिव प्रशांत मुळये, युवा सेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये, नगरसेवक व विभाग प्रमुख संजय गोताड, उपशहर प्रमुख राजू विखारे, मनोज पांचाळ, विभागप्रमुख संतोष मिरगल, मयूर फटकुरे उपविभाग प्रमुख दीपक कदम, युवा सेना उपशहर अधिकारी आकाश कदम, विभाग अधिकारी राहुल गुरव,सुजय जोगले आदी उपस्थित होते.
SIR कार्यक्रमात चिपळूण विधानसभा मतदारसंघ राज्यात प्रथम; प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा शिवसेनेतर्फे सत्कार..
