ठाणे : विकास लवांडे हे ज्या गावात राहतात त्या गावात त्यांना कुत्रंही विचारत नाही. २ जुलै २०२३ मध्ये आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर विकास लवांडे यांनी खालच्या पातळीवर जाऊन टिका केली हे आम्ही विसरलेलो नाही. ज्या नरकयातना अजितदादांना जिवंतपणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने दिल्या हेदेखील आमचे कार्यकर्ते विसरलेले नाही. आज फोटो दाखवून ट्वीट विकास लवांडे यांनी केले आहे.
ते अत्यंत नीच व खालच्या पातळीचे कृत्य आहे अशा शब्दात आपला संताप व्यक्त करतानाच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची माफी मागा अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करु ;ठाण्यात आलात तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योग्य समज देतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हाताची ही जखम एप्रिल २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गाडीच्या दरवाज्यात अंगठा आल्याने झाली होती. आणि ती जखम कशी झाली याची माहिती ॲड. प्रविण ठाकूर यांनी व्हिडिओ रिलीज करुन याबद्दलची इत्यंभूत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी ॲड. प्रविण ठाकूर हे शिवसेनेच्या अनंत गिते यांचे काम करत होते हेही आनंद परांजपे यांनी सांगितले.
विकास लवांडे तुमची लायकी काय आहे हे आम्हाला माहिती आहे अशा शब्दात आनंद परांजपे यांनी खडेबोल सुनावले आहेत.
काही दिवसापूर्वी शरदचंद्र पवार गटाचे राज राजापूरकर यांनीही प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उजव्या हाताच्या अनामिकेला जखम झाल्याचा एक खोटा व एआय प्रणित फोटो प्रसिद्ध केला होता. त्यांनीही सुनिल तटकरे यांची माफी मागावी. राज राजापूरकर हे ठाण्यातच राहतात त्यामुळे त्यांना समज द्यायला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वेळ लागणार नाही असा स्पष्ट इशाराही आनंद परांजपे यांनी दिला आहे.