दापोली (प्रतिनिधी)  :- दापोली तालुक्यातील विविध विभागात काल दिनांक २१ रोजी सुमारे ₹९ कोटी ८४ लाख ५६ हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यामध्ये प्रामुख्याने रस्ते आणि शाळेच्या नवीन इमारत बांधण्याच्या कामांचा समावेश आहे. जनतेच्या सातत्यपूर्ण मागणीचा आणि गरजेचा प्राधान्याने विचार करून संबंधित विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.
या कामांमध्ये प्रामुख्याने ₹३ कोटी ५१ लाख ३ हजार वांझळोली मांदिवली बाईतवाडी ते वांझळोली बौद्धवाडी रस्त्याचे डांबरीकरण, ₹१ कोटी ३३ लाख ४७ हजार डौली धनराजवाडी ते मानकवणेवाडी रस्त्याचे डांबरीकरण,
₹२ कोटी ८८ लाख ६८ हजार वेळवी धनकोली बौद्धवाडी रस्त्याचे डांबरीकरण, ₹१ कोटी ९९ लाख ८८ हजार शिवाजीनगर किरंबा सती देवी मंदिर ते गवळवाडी प्रजिमा रस्त्याचे डांबरीकरण, ₹११ लाख ५० हजार, शिवाजीनगर किरंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम. इत्यादी कामांचा समावेश आहे.
या सर्व कामांची भूमिपूजन नाम. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परिसरातील ज्येष्ठ आणि मान्यवर व्यक्तींच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, दापोली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती उन्मेष राजे, जिल्हापरिषदेचे सदस्य किशोर देसाई, सौ. एश्वर्या धाडवे, पं. समिती सदस्य सौ. सुवर्णा खळे, शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा महिला संघटीका सौ. रोहिणीताई दळवी जि. प. चे माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, सुनील दळवी, दापोली तालुका महिला संघटिका सौ. दीप्तीताई निखार्गे, जि. परिषदेच्या माजी सभापती श्रीम. रेश्मा झगडे यांच्यासह स्थानिक विभागप्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवा सेना आणि युवती सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही सर्व कामे दापोली तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी असून, पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबतच नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारी आहेत. भविष्यातील गरज लक्षात घेऊन अतिशय नियोजबध्द पद्धतीने ही कामे पूर्ण केली जातील.