खेड : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित “परशुराम हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, घाणेखुंट-लोटे” येथे ११व्या आयुर्वेद दिनानिमित्त बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयुर्वेद आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “अमनोरा येस फाऊंडेशन व सिटी ग्रुप, पुणे” यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शिबिरात नाडीपरीक्षा (रु.१०० मात्र-सवलतीच्या दरात), CBC व रक्तातील साखरेची तपासणी, विविध आजारांवरील आयुर्वेद तज्ज्ञांचे मार्गदर्शन व आवश्यक उपचार उपलब्ध असतील. सांधेदुखी, अंगदुखी, केस गळणे, गुदविकार, महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या, PCOD व वंध्यत्व, तसेच नेत्रविकार याबाबत तपासणी व समुपदेशन करण्यात येणार आहे. Video Proctoscopy, स्तनकर्करोग तपासणीसाठी मार्गदर्शन, उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी आणि Mindfulness Therapy यांचाही लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
आयुर्वेदाच्या माध्यमातून रोगप्रतिबंध, आरोग्यसंवर्धन व निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. परिसरातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क :
सौ सुश्मिता पाटील – ७७७५९७२४४१
श्री मंगेश शेठ – ९२७१६८६५४४
श्री संजय आंब्रे – ९७९७९७७०१८