चिपळूण (प्रतिनिधी) : शहर व परिसरातील महिलांना दर्जेदार, सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक स्त्रीरोग व प्रसूती सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने अपरान्त मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रियंका विखारे (एमबीबीएस, डीजीओ, डीएनबी, एफआरएम, एफएमएएस) या स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ म्हणून रुजू झाल्या आहेत.
डॉ. विखारे यांच्या नियुक्तीमुळे गर्भधारणा, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी, मासिक पाळीशी संबंधित समस्या, वंध्यत्व उपचार, उच्च-जोखीम गर्भधारणेचे व्यवस्थापन, स्त्रीरोगांवरील शस्त्रक्रिया तसेच विविध स्त्रीरोगांवरील तज्ज्ञ उपचार आता एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र क्षेत्रातील सुमारे १४ वर्षांचा अनुभव असलेल्या डॉ. विखारे यांनी मुंबईतील व्ही. एन. देसाई जनरल हॉस्पिटल, जयपूर येथील आर. डी. पी. बी. हॉस्पिटल, चिपळूणमधील मातृत्व मॅटर्निटी क्लिनिक, इन्स्पायरी लॅप्रोस्कोपिक अँड आयव्हीएफ रिसर्च सेंटर, नाडकर्णी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, दीपचंद बंधू हॉस्पिटल, फरीदाबाद येथील एशियन हॉस्पिटल, दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज तसेच महर्षी वाल्मिकी हॉस्पिटलमध्ये सेवा बजावली आहे.
त्यांचे वैद्यकीय शिक्षण संतोष मेडिकल कॉलेज, गाझियाबाद येथे झाले असून, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणे येथून डीजीओ तसेच राजस्थान युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमार्फत डीएनबी पदवी त्यांनी संपादन केली आहे.
रुग्णांशी सौहार्दपूर्ण संवाद, अचूक निदान आणि परिणामकारक उपचार ही त्यांची विशेष ओळख मानली जाते. विशेषतः गर्भारपणातील नियमित तपासणी, उच्च-जोखीम गर्भधारणेचे व्यवस्थापन, सुरक्षित प्रसूती तसेच माता व नवजात बाळाच्या आरोग्याची सर्वंकष काळजी यावर त्यांचा विशेष भर असणार आहे. त्या दररोज दोन ते पाच या वेळामध्ये अपरान्त हॉस्पिटलमध्ये रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध असतील.
अपरान्त हॉस्पिटलने मुंबई, पुणे, कोल्हापूर,सांगली, मिरज सारखी आधुनिक आरोग्यसेवा चिपळूणमध्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध केली आहे. यामध्ये केईएम-प्रशिक्षित शल्यविशारद डॉ. सदगुरू पाटणकर, हृदयविकार व मधुमेहतज्ज्ञ डॉ. अतुल बोरोडे, फिजिशियन डॉ. ओंकार खोत, अस्थिरोग व सांधेविकार तज्ज्ञ डॉ. श्रीश भास्करवार, श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सौरभ सुर्वे, स्त्रीविकार व वंध्यत्व तज्ञ डॉक्टर पूजा भुरण, रेडिओलॉजिस्ट व सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. सचिन विधाते तसेच पॅथॉलॉजिस्ट डॉ. सूरज शिकलगार यांचा समावेश आहे.
हॉस्पिटलमध्ये २४x७ आपत्कालीन सेवा उपलब्ध असून, अपॉइंटमेंटसाठी ७९९८८९८९८९, ७९९८७३७३७३ किंवा (०२३५५) २५४२५४ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. हॉस्पिटलचा पत्ता – सावित्री एन्क्लेव्ह, एलआयसी कार्यालयासमोर, भोगाळे, चिपळूण.
“आरोग्याच्या सर्व सेवा – एकाच छताखाली”* या ध्येयवाक्यानुसार महिलांसाठी अधिक सक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने अपरान्त हॉस्पिटलने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
अपरांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. प्रियंका विखारे रुजू….
