मुंबई : भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 135 व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. प्रदेश भाजपा उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांच्या हस्ते मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत, सदाशिव चौधरी आदी उपस्थित होते.
भाजपा प्रदेश कार्यालयात आंबेडकर जयंती साजरी
