माणगाव : तालुक्यातील उमरोली गावचे सुपुत्र योगेश काशिराम खडतर यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या माणगांव तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, जिल्हा सरचिटणीस हेमा मानकर, भाजपा तालुकाध्यक्ष परेश सांगले, जेष्ठ नेते संजय आप्पा ढवळे, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अनंत लाड, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपाली कासारे, महिला तालुकाध्यक्षा रचना थोरे, तालुका सरचिटणीस किसन महाडिक, बाबुराव चव्हाण, उपाध्यक्ष सुधीर म्हामुणकर, अनिल दांडेकर, माजी तालुकाध्यक्ष उमेश साटम व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना निलेश थोरे यांनी सांगितले कि, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला परंतु विचारधारेमध्ये सतत कार्यरत असणारा कुणबी समाजाचा युवा चेहरा म्हणून योगेश खडतर यांच्याकडे पहिले जाते. तरुणांची व विद्यार्थ्यांचे दाखले, प्रमाणपत्रे इतर कागदोपत्री ज्ञान असणारे योगेश खडतर यांच्यामुळे युवामोर्चाला भविष्यात चांगली बांधणी करता येईल त्यामुळेच त्यांना जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील, सरचिटणीस सतीश धारप, श्रीवर्धन विधानसभा प्रमुख प्रशांत शिंदे, तालुकाध्यक्ष परेश सांगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही अत्यंत महत्वाची जबाबदारी दिलेली असून भविष्यात ते पक्षाला अधिक बळकट करतील हा विश्वास आहे.

यावेळी योगेश खडतर यांनी सांगितले कि पक्षात, आल्यानंतर प्रथमच एवढी मोठी जबाबदारी देऊन वरिष्ठ नेतृत्वाने माझा सन्मान केला आहे व या संधीचे सोने करून भविष्यात माणगांव तालुका युवा मोर्चा अधिक मजबूत करण्यासाठी व तालुक्यातील युवा, युवतींच्या प्रश्नावर भर देऊन तरुणांना रोजगार, शिक्षण, क्रीडा या सर्व क्षेत्रात सहकार्य करणार असल्याचे सांगितले.