चिपळूण : बेळगांव निवासी परमपूज्य आई श्री कलावतीदेवी यांच्या भजनी मंडळाचा 7 दिवसीय भजनाचा कार्यक्रम चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.हा हरिनाम सप्ताह सोमवार दि. 23 नोव्हेंबर 2026 ते रविवार दि. 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत चालणार आहे. सर्व भाविकांनी या भजनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हरिनाम सप्ताहातील वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 7 ते 8.30 वाजेपर्यंत संगीत भजन प्रातःस्मरण होईल. सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत संगीत भजन सायंस्मरण व अनुभव कथन होईल. रात्री 8.30 ते 10 वाजेपर्यंत श्रीकृष्णप्रताप व अनुभव कथन होणार आहे.

रविवार दि. 29 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 7 ते 8.30 वाजता लहान मुलांसाठी खास बालोपासनेचा कार्यक्रम होणार आहे.

अखंड नामस्मरण सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भगिनींसाठी आणि रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंधूंसाठी ठेवण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सिद्धकला परमार्थ निकेतन, चिंचनाका भोगाळे, चिपळूण, जि. रत्नागिरी येथे होणार आहे. श्री सिद्धकला भजनी मंडळ संस्था, चिपळूण यांच्या वतीने हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. परमार्थ निकेतन चिपळूण येथे त्रिकाळ उपासना व सर्व उत्सव साजरे केले जातात.

सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहात सहभागी होऊन भक्तीचा लाभ घ्यावा, अशी नम्र विनंती मंडळाने केली आहे.