चिपळूण : शहरामध्ये कावीळतळी,शंकरवाडी, मार्कंडी,परशुराम नगर वस्ती आदी परिसरातील बांधवांचे शहरातील पहिले सकल हिंदू संमेलन उद्या दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आले आहे. सदरचे संमेलन बांदल हायस्कूल सभागृह चिपळूण या ठिकाणी संपन्न होणार आहे.
त्याचप्रमाणे वस्तीनिहाय हिंदू संमेलन खेर्डी वस्ती – दत्तमंदिर माळे वाडी खेर्डी,रावतळे वस्ती – श्री विंध्यावासिनी माता मंदिर रावतळे,माधवबाग-कालभैरव मंदिर-चिंचनाका-मुरादपूर वस्ती – इंदिरा गांधी केंद्रासमोर वेस मारुती जवळ,खेंड वस्ती –
श्री गोपाळकृष्ण मंदिर, हवेली, खेंड,पाग-बुरुमतळी वस्ती – या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीचे संरक्षण आणि हिंदू समाजाचे संघटन करून भारत देशाला परम वैभव संपन्न करण्यासाठी सर्व हिंदू बांधव सहकुटुंब या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत.या संमेलनामध्ये सायंकाळी साडेचार वाजल्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.यामध्ये महाराष्ट्र गीत,हरिपाठ,पोवाडा,
लोककला कार्यक्रम, पंच परिवर्तन असे विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन हिंदू बांधवांतर्फे करण्यात आले आहे.याप्रसंगी ॲड.अमेय मालशे हिंदू जागरण मंच यांचे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन लाभणार आहे. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कावीळतळी,शंकरवाडी, मार्कंडी, परशुराम नगर वस्ती येथील हिंदू बांधव मेहनत घेत आहेत. तरी जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन गजानन लोकरे, अध्यक्ष सकल हिंदू संमेलन समिती यांनी केले आहे.