चिपळूण (प्रतिनिधी):- राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र समोरील मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित पुष्पांजली कार्यक्रमात आ. भास्कर जाधव यांच्यासह आ. प्रमोद जठार, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आदींनी दादांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन केले. तर यावेळी पवन तलाव मैदान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती सर्वपक्षीयांतर्फे चिपळूणमध्ये साजरी करण्यात आली. यामध्ये शहरातील पवन तलाव मैदान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तत्पूर्वी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहून सर्वपक्षीयांनी अभिवादन केले.
यावेळी आ. भास्कर जाधव यांनी आपल्या मनोगतात “अजितदादा दादा म्हणजे कठोर शिस्त, स्पष्ट विचार आणि निर्माण मनाचा राजा माणूस!” जनतेच्या प्रश्नांसाठी सतत झटणारे कार्यकर्त्यांशी आपुलकीने वागणारे आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून अजितदादांची ओळख कायम राहील. त्यांच्या कामाची पद्धत शिस्त आणि लोकांशी असलेला जिव्हाळा हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे, अशी भावना आ. जाधव यांनी व्यक्त केली
तर आ. प्रमोद जठार यांनी दादांविषयी आपली भावना मांडली. भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देतांना दादांच्या निधनाने दादांच्या कुटुंबीयांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दुःख झाले. कार्यकर्त्यांना समजून घेणारा न्याय देणारा, ताकद देणारा अशी दादांची ओळख होती. उद्याच्या महाराष्ट्राच्या भविष्याच्या हितासाठी रात्रं-दिवस काम करणारा असा नेता आपण गमावून बसलो आहोत, अशा शब्दात यादव यांनी आपली भावना व्यक्त केली. तर माजी सभापती शौकत मुकादम यांनी देखील दादांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. जागृती शिंदे, शहराध्यक्ष सौ.आदिती देशपांडे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, नगरसेवक शुभम पिसे, संदीप भिसे, उदय जुवळे, योगेश पवार, नगरसेविका सौ. उमा देसाई, पंचायत समितीचे माजी सभापती राजाराम चाळके, माजी सदस्य प्रताप शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सीताराम शिंदे, समीर जानवलकर, खालीद दाभोळकर, सतीश खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते राजू पवार, मनोज जाधव, डॉ. राकेश चाळके, खालिद पटाईत, सचिन पाटेकर, मुख्याधिकारी संजय जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या दिशा दाभोळकर, पूनम भोजने, शिवसेनेच्या महिला आघाडी शहर प्रमुख सौ. प्राजक्ता टकले, सौ. सुकन्या चव्हाण, सौ. रवीना गुजर, डॉ. सौ. रहमत जबले, माजी नगरसेविका सौ. वर्षा जागृष्टे, सौ. शिवानी पवार आदी उपस्थित होते. या सर्वांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले.
