मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या सर्व विभाग व सेलचे प्रदेश काँग्रेस कमिटी सोबत समन्वय राहण्यासाठी तसेच या विभाग व सेल मार्फत राबविण्यात येणारे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आणि विभाग व सेलच्या नियुक्त्यांमध्ये सुत्रबध्दता ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून विभाग व सेल प्रदेश समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे प्रमुख शाहआलम शेख तर डॉ. धनंजय क्षिरसागर आणि जावेद फारुकी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी पंकज गुड्डेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्यांबद्दल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.