चिपळूण : मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूल मिरजोळी या विद्यालयामध्ये संस्थेच्या विद्यार्थी कल्याण निधी मंडळातर्फे दरवर्षी विद्यालयातील होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येते.
दिनांक १०/०८/२०२६ रोजी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीतील होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या कल्याण निधी मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेशजी बापू चव्हाण उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री. रोहित जाधव सर यांच्या हस्ते श्री. मंगेशजी बापू चव्हाण सर यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
श्री.मंगेशजी चव्हाण यांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. गणवेश वाटपानंतर श्री चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या उदात्त हेतूबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना भविष्यात आपणही संस्थेला असेच सहकार्य करावे याबाबत आपल्या मनोगतातून आवाहन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी देखील आपल्या मनोगतातून संस्थेच्या उदात्त धोरणाबाबत माहिती देऊन संस्थेचे पर्यायाने विद्यालयाचे नाव उज्वल करण्याचे विद्यार्थ्यांनाआवाहन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या शिक्षिका सौ विद्या रोहित जाधव मॅडम तसेच शिक्षक श्री भैय्या दिनकर पाटील सर यांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाच्या प्रमुख विद्यालयाच्या शिक्षिका सौ. समिधा संतोष डांगे मॅडमनी मान्यवरांचे आभार मानून संस्थेचे धन्यवाद मानले.