चिपळूण, ता. ८ : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात ता. १५ रोजी दुर्बिणीद्वारे हर्निया शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. शिबिरासाठी मुंबईतील नामवंत डॉ. मंदार गाडगीळ, डॉ. निधी खंडेलवाल व डॉ. अरबाझ मोमीन हे उपस्थित राहणार आहेत.

हर्निया म्हणजे रुग्णाच्या पोटातील लहान आतडे हे जांघेतील कमकुव भागातून लघवीच्या जागेकडे सरकते आणि हर्निया ची गाठ निर्माण होते. या गाठीत काही वेळा आतील आतडयाला पिळ पडला तर रक्त पुरवठा कमी होऊन आतड्याचे गॅंगरीन होऊ शकते व रुग्ण सिरियस होऊ शकतो, अशा रुग्णाचे वेळीच ऑपेरेशन करणे गरजेचे असते. त्यामुळे हि गुंतागुंत टाळण्यासाठी वेळीच जर हॅर्निया काढला तर शस्त्रक्रिया सोपी, सहज होते. आता तर दुर्बीण वापरल्यामुळे अगदी छोटा छेद घेऊन हॅर्निया काढणे सहज शक्य झाले आहे. या पद्धतीने रुग्ण लवकर बरा होतो.
मुंबईतील नामवंत सर्जन डॉ. मंदार गाडगीळ, डॉ. निधी खंडेलवाल व डॉ. अरबाझ मोमीन ह्यांचा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेत हातखंडा आहे. कोकणातील रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वालावलकर रुग्णालयातर्फे करण्यात आलेले आहे. इच्छुक रुग्णांनी नाव नोंदणी करून दुर्बिणीद्वारे हॅर्निया शिबिराचा लाभ घ्यावा.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH