खेड :- येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप इंग्लिश मिडिअम स्कूल मोरवंडे-बोरज या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली. या स्पर्धेत प्रशालेच्या खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत दोन महत्त्वपूर्ण यश संपादन केले.
Under-19 Boys संघ — द्वितीय क्रमांक (रौप्यपदक), Under-17 Boys संघ — तृतीय क्रमांक (कांस्यपदक) दोन्ही संघातील खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघभावना, शिस्त, जिद्द आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे दर्शन घडवत प्रशालेचा गौरव वाढवला. U 19 मुले – प्रणव किंजळे,सार्थक शिगवण,राज वागले,सक्षम संसारे,आदित्य खापरे, हर्ष चाळके, ऋग्वेद मोरे, अवधूत महाडिक, आर्यन पाटील,सुजल गुजर. आणि U 17 मुले – यथार्थ चव्हाण, सार्थ जंगम,अर्जुन आंब्रे, आयुष काटकर हर्षिल धाडवे, प्रशिक कदम, सार्थक आंब्रे,आराध्य गाथे, साई चाळके, आर्यन जाधव या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री. आशिष देशमाने व सौ. हर्षदा पार्टे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस श्री. माधव पेठे, खजिनदार श्री. विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी श्री. दीपक लढ्ढा, विश्वस्त श्री. पेराज जोयसर, श्री. भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य श्री. चंदन पाटणे, श्री. प्रफुल्ल महाजन, श्री. अनिल शिवदे, श्रीमती रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळाचे सदस्य, प्रशालेचे प्राचार्य श्री. भरत मोरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी यशस्वी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
ज्ञानदीप प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.