मुंबई : दुबईला निर्यात होणाऱ्या पेट्रोलियम जेलीची कंटेनरमधून चोरी झाल्याचा प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. तळोजा येथील गांधार ऑइल रिफायनरीमधून जेएनपीटीमार्गे दुबईला जाणाऱ्या कंटेनरमधून सुमारे ४०० लिटर पेट्रोलियम जेली चोरी करण्यात आली. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपी पाइपच्या साहाय्याने कंटेनरमधील जेली काढून पिकअप व्हॅनमधील बॅरलमध्ये भरत असताना पोलिसांनी छापा टाकला. चोरी केलेल्या जेलीची किंमत सुमारे एक लाख रुपये असून, कंटेनर, पिकअप व्हॅन आणि ट्रेलरसह एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या चोरीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
About The Author
Related Posts
Recent Posts
- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन, महाराष्ट्रतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ₹३,३३,३३३ ची मदत…
- IDBI बँक परकीय भांडवलदारांना विकण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेसची २८ नोव्हेंबरला सभा…
- भाजपाचे माजी आमदार मोहन रायचुरा यांचे निधन…
- तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला पुजारी आणि स्थानिकांचा विरोध; तहसील कार्यालयासमोर उपोषण…
- संजय राऊत हे महिला आरक्षण आणि संविधानविरोधी; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल…