लांजा: दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीनु कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

उच्च न्यायालयाने सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव ३१ जानेवारी २०२५ रोजी राज्य शासनाकडे सादर केला होता. मात्र, २१ महिने उलटूनही शासनाने निर्णय न घेतल्याने कर्मचारी संघटनांनी मंगळवार पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शासनाकडून अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनात लांजा दिवाणी न्यायालयातील २४ कर्मचारी सहभागी झाल्याने न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे.