मुंबई – राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान या वेतनाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.
शेतकरी बांधवांवर आलेल्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे, हीच स्व. अजितदादांनी आपल्याला दिलेली खरी शिकवण आहे. दादांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत, शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी योगदान देणे, ही आपली सामूहिक जबाबदारी असून शेतकरी बांधवांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहणे, हाच यामागचा प्रामाणिक भाव आहे असे आमदारांनी स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे आदींसह पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते.