वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आरएसएसच्या नागपूर येथील मुख्यालयावर “विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा” काढला जाणार आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते यात सहभागी होतील.

भारत एक संविधानिक व्यवस्थेवर चालणारा देश आहे. पण एपस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आल्यामुळे मोदींनी देशाचे सार्वभौमत्व हे अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे. जगभरात ज्यांचे नाव एपस्टीन फाईलमध्ये आले त्यांचावर कारवाई झाली, पण मोदींवर कारवाई झाली नाही. 23 मार्चला आरएसएस मुख्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चानंतर ब्लॅकमेल होणारा मोदीला किती काळ पंतप्रधान ठेवायचे याचा निर्णय आरएसएसला घ्यावा लागेल. जनतेने मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी व्हावे.

सर्व वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, डिजिटल माध्यमे आणि स्वतंत्र पत्रकारांनी या आंदोलनाचे वार्तांकन करावे, ही विनंती.

स्थळ : संविधान चौक ते आरएसएस मुख्य कार्यालय, नागपूर

दिनांक : 23 मार्च 2026
वेळ : दुपारी 12.00 वाजता