चिपळूण : जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. उदयजी सामंत साहेब हे चिपळूणमध्ये पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता, त्यांच्यासोबत चर्चा करताना प्रांतिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ, प्रांताधिकारी आकाशी लिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कळंबस्ते येथील वाशिष्ठी पुलाजवळ गणपती विसर्जन घाट बांधण्याबाबत माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी त्यांना निवेदन दिले. सदर ठिकाणी गणपती विसर्जन घाट तातडीने उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, यासाठी आमदार शेखरजी निकम यांनीही पालकमंत्री यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.