खालापूर : यामध्ये सांताक्रूझ, मुंबई येथील एका विवाहित महिलेच्या पतीच्या प्रेयसीमुळे झालेल्या वादामुळे, आपल्या वडिलांचे मित्र असलेले अब्दुल रशीद उर्फ बाबाजान, रा. कळंबोली, नवी मुंबई येथील जादूटोणा करणाऱ्या भोंदू बाबाकडे ती गेली.
सदर भोंदू बाबाने उपाय करून देतो असे सांगून प्रथम पिडीत महिलेला तिच्या माहेरी बोलावून घेतले. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड (अष्टविनायक क्षेत्र) येथे एका घरी आणले.
महड येथे, एका मध्यरात्री जादूटोण्याचे काही उपचार करतो असे सांगून, घराबाहेरील जागेत काही वस्तू पुरल्या. तसेच, पिडीत महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढून तो एका पांढऱ्या धाग्यावर लावून तो धागा जाळून जादूटोणा करण्याच्या बहाण्याने सदर महिलेवर अत्याचार केला.
पिडीत महिलेवर अत्याचार झाला, परंतु कोणतेही उपचार झाले नाहीत. ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने खालापूर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.
रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली व खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या सूचनेनुसार, खालापूर पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने तपास करून कळंबोली येथील सदर भोंदू बाबाला अटक केली व त्याला खालापूर न्यायालयात हजर केले.
