खालापूर : खालापूर तालुक्यातील होराळे येथील श्री विठ्ठल मंदिर सभागृहात देवा भाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा आज (27 जुलै) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती
कार्यक्रमाला भारतीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर सांगळे, ज्येष्ठ नेते मनीष खवळे, विठ्ठल मोरे, शरद कदम खालापूर तालुका (पूर्व) अध्यक्ष सनी यादव, युवा मोर्चाचे नागेश पाटील, पहिला मोर्चा अध्यक्ष श्वेता मनवे, त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी या उपक्रमाची भूमिका स्पष्ट करताना कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती देताना ती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याविषयी कार्यकर्त्यांना आवाहन केले. प्रतिनिधिक स्वरूपात काही महिलांनी या व उपक्रमाचे कौतुक केले व आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी तालुका अध्यक्ष सन्नी यादव यांनी आभार व्यक्त केले.